महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी, पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी तुंबले - दमदार

शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला. सकाळी ९ ते १० या एक तासात अंधेरी परिसरात ८ मिलिमीटर, तर दिंडोशी गोरेगाव येथे ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्याची नोंद आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

By

Published : Jun 28, 2019, 11:16 AM IST

Updated : Jun 28, 2019, 12:08 PM IST

मुंबई - शहरासह उपनगरात आज सकाळी साडेआठ वाजेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उपनगरातील विक्रोळी घाटकोपर पवई कांजूर-भांडूप येथे सकाळपासून सुर्यदर्शनही झाले नाही. मात्र, आज कोसळेल्या सरींमुळे अनेक दिवसांपासूनच्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

राज्यात मान्सूनचे आगमन झाले असतानाही मुंबईत पाऊस पडलेला नव्हता. तसेच तापमान देखील अधिक असल्याने मुंबईकर उकाड्यापासून त्रस्त झाले होते. मात्र, २८ आणि २९ जूनला जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू झाली होती. मात्र, आज सकाळीच पावसाने जोर धरला आहे. पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर भागात ही मुसळधार सरी कोसळत आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे वाहतूक देखील खोळंबळी आहे. तसेच रेल्वे उशिराने धावत आहेत. तसेच ढगाचा गडगडाटही सुरू झाला असल्याची माहिती ईटीव्ही भारतच्या मुंबईतील ठिकठिकाणच्या वार्ताहराने दिलेली आहे.

गेल्या एक तासात अंधेरी परिसरात ८ मिलिमीटर, तर दिंडोशी गोरेगाव येथे ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्याची नोंद आहे.

Last Updated : Jun 28, 2019, 12:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details