मुंबई- शहरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील दादर परिसरात सर्वाधिक पाऊस झाला असून, तिथे १६८.१५ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
शहरात आज सकाळी ८ ते दुपारी २ या सहा तासांच्या दरम्यान शहर परिसरात सरासरी १००.९७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये १३१.४९ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर पश्चिम उपनगरांमध्ये १४५.६५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद ही महापालिकेच्या के-पूर्व (अंधेरी पूर्व) विभाग कार्यक्षेत्रात झाली असून या परिसरात २१४.३५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
शहर भागात सर्वाधिक पाऊस दादर परिसरात झाला असून तिथे १६८.१५ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. या खालोखाल वडाळा परिसरात १५८.९७, धारावी परिसरात १४८.५८, रावळी कॅम्प परिसरात १३९.२ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर हिंदमाता परिसराचा समावेश असलेल्या एफ-दक्षिण विभागात ११३.७८ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे याच कालावधीत एकूण ६९.३५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
पूर्व व पश्चिम उपनगरामध्ये पावसाची जोरदार हजेरी