महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत पावसाची दमदार हजेरी; पूर्व उपनगरात धो-धो - मुंबईत पावसाची दमदार हजेरी

आठवडाभराच्या उसंतीनंतर मुंबईत शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरातील मुलुंड,भांडुप,पवई,घाटकोपर,मानखुर्द,चेंबूर कुर्ला,सायन या विभागात पावसाने दमदार बॅटिंग केली

heavy rainfall in mumbai
मुंबईत पावसाची दमदार हजेरी

By

Published : Oct 4, 2020, 7:51 AM IST

मुंबई- काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्री पासून मुंबईच्या पूर्व उपनगरात जोरदार बरसायला सुरुवात केली. यामुळे मुंबईकरांची मात्र त्रेधातिरपीट उडाली, शनिवारी सायंकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते. त्यानंतर अचानक विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह उपनगरात शनिवारी रात्रभर पाऊस सुरू होता.

मुंबईत पावसाची दमदार हजेरी

मुंबईसह मुलुंड, भांडुप, पवई, घाटकोपर, मानखुर्द, चेंबूर, कुर्ला, सायन या विभागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विक्रोळीच्या पार्क साईटमध्ये तर पावसामुळे 90 फूट रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते आणि पाणी वेगाने वाहत होते. त्यामुळे लहान वाहनधारकांची तारांबळ उडाली. चुनाभट्टी विभागातील धावजी केणी मार्ग, स्वदेशी मिल वसाहतीत पावसाचे पाणी भरले आहे, तर असल्फा मेट्रो स्टेशन, चेंबूर टिळकनगर मधील काही ठिकाणीह सखल भागात पाणी सुद्धा भरलेले पहायला मिळाले आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शनिवारी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात ५ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details