मुंबई - आठवडाभराहुन अधिक काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्रीपासुन परत बरसायला सुरुवात केली. या मुसळधार पाऊसामुळे शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था तसेच लोकलवर देखील याचा परिणाम झाला आहे.
मुंबईसह उपनगरात कोसळधार; पुढील 48 तास बरसणार पाऊस - पाऊस
मुंबई शहर व उपनगरात मध्यरात्रीपासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून पुढील 48 तास आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान थोडी विश्रांती घेतली होती. परंतु पुन्हा एकदा हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार मुंबईत मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याने पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मंगळवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून गर्मीने हैराण झालेले मुंबईकर काल मध्यरात्रीपासून जरा सुखावले आहेत. तर मुसळधार पावसामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची व शाळेत जाणाऱ्या मुलांची चांगलीच तारांबळ उडाली.
हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात मुंबईसह कोकणात असाच मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे गरज असेल तेव्हाच नागरिकांना बाहेर पडावे व स्वतःची काळजी घ्यावी असे प्रशासन व हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.