मुंबई -गणेशोत्सवाला काल (सोमवार) धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. गणेशोत्सव साजरा होत असताना पावसाने मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली. यामुळे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासमोर विघ्न निर्माण झाले आहे.
चौपाट्या, तलाव येथे प्रशासनाकडून विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पावसात विसर्जनाला निघायचे कसे? असा प्रश्न गणेश भक्तांसमोर निर्माण झाला आहे. तरीही अनेक जण मुसळधार पावसात विसर्जनासाठी बाहेर निघाले आहेत.सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज (मंगळवारी) दिवसभर अधूनमधून कोसळत आहे.