महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत जोरदार पाऊस; येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

आज सकाळपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान, कुलाबा परिसरात 24 मि.मी. तर नरिमन पॉईंट परिसरात 19 मि.मी. नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसात मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उपनगरातील कांदिवली, मलाड, बोरीवली भागातही मुसळधार पाऊस कोसळत असून ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rain
मुंबई पाऊस

By

Published : Jul 3, 2020, 12:50 PM IST

Updated : Jul 3, 2020, 3:47 PM IST

मुंबई - हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान, कुलाबा परिसरात 24 मि.मी. तर नरिमन पॉईंट परिसरात 19 मि.मी. नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसात मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उपनगरातील कांदिवली, मलाड, बोरीवली भागातही मुसळधार पाऊस कोसळत असून ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईत किनारपट्टीच्या भागात 4.41 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत.

येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

घरातच थांबा, मुंबई पोलिसांचे आवाहन -

महाराष्ट्रात जून महिन्यात पाऊस दाखल झाला. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून मुंबई आणि ठाण्यात पावसाने उघडीप दिली होती. आता मुंबई आणि परिसरात पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे. मुंबईत दोन दिवस (3 आणि 4 जुलै) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तास मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Last Updated : Jul 3, 2020, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details