महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत परत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील किनारपट्टीसह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खाते

By

Published : Aug 8, 2019, 3:27 AM IST

मुंबई- मागच्या आठवड्यात मुंबईला झोडपल्या नंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा मुंबईत मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील किनारपट्टीसह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून उत्तर कोकणात व पालघरमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गुरुवारी पालघरमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच पालघरच्या तुलनेत मुंबईत पावसाचा जोर कमी असणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा जोर असेल व त्या तुलनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पावसाचे प्रमाण कमी असेल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details