मुंबई - कोकणासह मुंबई, मध्य महाराष्ट्रात आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार) जोरदार पावासाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, पालघर, रागयड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बुधवारी मुंबईसह कोकणात सारखीच परिस्थिती राहील. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस होईल. गुरुवारी कोकणातील काही भागात तीव्र पाऊस असेल. यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, असे हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूत्ते यांनी सांगितले.