महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Weather Update : मुंबईत पावसाला सुरुवात, पुढील चार दिवस धोक्याचे

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईतील छायाचित्र
मुंबईतील छायाचित्र

By

Published : Jun 8, 2021, 3:07 PM IST

Updated : Jun 8, 2021, 5:24 PM IST

मुंबई -मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला. या साऱ्याचा परिणाम आजपासूनच मुंबईतील अनेक भागात जाणवू लागला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सकाळपासूनच बरसत आहे. दक्षिण मुंबई, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर या भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून जोरदार पाऊस बरसत होता. आता काही पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईकरांची काही काळ तारांबळ उडाली.

मुंबईत पावसाला सुरुवात, पुढील चार दिवस धोक्याचे

मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात जवळील नवी मुंबई, रायगड, ठाणे या भागात देखील ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईच्या काही ठिकाणी जोरदार पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली आहे. अजून मुंबईकरांना चार दिवस काढायचे आहेत कारण की पुढील चार दिवस ही मुंबईकरांसाठी धोक्याचे आहेत. हवामान विभागाकडून कालच मुंबईसह जवळील भागात अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात 300 मिलिमीटरहून जास्त पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

पावसानंतर जलमय झालेला परिसर

महापालिकेची तयारी

यावर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी 474 पंप बसवण्यात आले आहे. याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाणार आहे. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंता स्पॉटवर राहून पाणी निचऱ्याचे काम करणार आहेत. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्याला निधी देऊन स्कॉड तयार करण्यात आले आहे . हे स्कॉड त्या वॉर्डमध्ये झाडे पडल्यास, हायटाईडमुळे अडचणी निर्माण झाल्यास त्याच्या निवारणाचे काम करणार आहेत. प्रत्येक वार्डात महापालिकेच्या पाच शाळा तयार ठेवल्या असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

पावसानंतर जलमय झालेला परिसर

हेही वाचा -मुंबईत मान्सूनची हजेरी; वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू

Last Updated : Jun 8, 2021, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details