महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवईमध्ये मुसळधार पाऊस, घरांमध्ये शिरले पाणी - mumbai heavy rain

सकाळपासून मुंबई उपनगरात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पवईतील चैतन्य नगर, इंदिरा नगर, भाजी मंडई ठिकाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.

heavy rain in powai
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला.. पवईमध्ये मुसळधार पावसामुळे शिरले घरामध्ये पाणी

By

Published : Jul 3, 2020, 1:45 PM IST

मुंबई - सकाळपासून मुंबई उपनगरात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पवईतील चैतन्य नगर, इंदिरा नगर, भाजी मंडई ठिकाणी नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या पावसात पवईकरांची चिंता वाढली आहे.

पवईतील डोंगराळ सहीत सखल भागात वसलेल्या झोपडपट्यांमध्ये प्रत्येक वर्षाच्या पावसात ही परिस्थिती असते. त्यामुळे योग्य वेळी नाले सफाई होत नसल्यामुळे असंख्य झोपडपट्टीत दुकानात पावसाच्या पाण्यासहीत गटाराचे पाणी घरात शिरतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन काळात काही ठिकाणी नाले सफाई झाली काही ठिकाणी झालीच नाही, त्यामुळे गटारे तुडुंब भरवून वाहत असल्याचे स्थानिक रहीवासी रमेश कांबळे यांनी सांगितले.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला.. पवईमध्ये मुसळधार पावसामुळे शिरले घरामध्ये पाणी

पावसाचा जोर वाढणार -

जून महिन्यामध्ये कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र, जुलैमध्ये कोकणात आणि संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूत्ते यांनी पावसाच्या शक्यतेबद्दल माहिती दिली आहे.

आता पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे मुंबई आणि कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांमध्ये म्हणजे 3 आणि 4 जुलैला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या विषयी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details