महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मूसळधार पावसाने नवी मुंबईकरांची दैना; ऐरोलीत साचलेल्या पाण्यात अडकल्या गाड्या - heavy rain mumbai

शहरातील महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अनेक कार पाण्याखाली गेल्या आहेत. ऐरोलीत रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून अनेक दुचाकी चालक मोठ्या शर्तीने  पाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न  करत आहेत. काल मंगळवारी सकाळपासून पडत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. नवी मुंबई, पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे आणि सायन-पनवेल महामार्गावरही पावसाचे पाणी साचले आहे.

पावसाने नवी मुंबईकरांची दैना

By

Published : Sep 4, 2019, 5:24 PM IST

मुंबई -धुवांधार सुरू असलेल्या पावसाने नवी मुंबईकरांची दैना उडवली आहे. येथील अनेक रस्त्यावर पाणीच-पाणी झाले आहे. जवळ-जवळ गुडघाभर पाणी रस्त्यावर भरले आहे. त्यामुळे अनेक रस्त्यावर वाहने अडकली आहेत. ऐरोलीमध्ये पुलाखाली रस्त्यावरुन नदी वाहत असल्याचे चित्र तयार झाले आहे.

हेही वाचा-पावसामुळे सायन-पनवेल रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

येथील महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अनेक कार पाण्याखाली गेल्या आहेत. ऐरोलीत रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून अनेक दुचाकी चालक मोठ्या शर्तीने पाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवार सकाळपासून पडत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. नवी मुंबई, पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे आणि सायन-पनवेल महामार्गावरही पावसाचे पाणी साचले आहे. गावठाण भागातील बैठ्या चाळींमध्ये घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील सामानांची नासधूस झाली आहे. ऐरोली टी जंक्शन, भुयारी मार्ग ऐरोली अंडरपासमध्ये देखील पाणी साचले आहे. कोपरखैरणे, महापे, वाशी, तुर्भे एपीएमसी पोलीस ठाणे आणि लगत परिसरात पाणी साचले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details