मुंबई - सकाळपासून मुंबईसह परिसरात धो-धो पाऊल कोसळत आहे. त्यामुळे येथील जिवनमान विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच- पाणी दिसत आहे. रेल्वे लाईनवरही पाणी साचल्याने लोकलचे वेळापत्र पुर्णत: कोलमडले आहे. चाकरमान्यांचीही आज दिवरभर चागलीच तारांबळ उडाली आहे. सायन कुर्ला रेल्वे लाईनवर अजुनही पाणी साचलेले आहे. येथील वाहतुक अजुनही 3 तास बंद राहण्याचा अंदाज आहे.
पुन्हा मुंबईची तुंबई; दादर,वडाळा, नायगाव परिसरात पाणीच पाणी - मुंबई बातमी
मुसळधार पावसामुळे दादर, वडाळा आणि नायगाव परिसरात पाणी साचले आहे. वडाळा स्थानक परिसरात असलेल्या चार रस्ता परिसरावर सकाळी 11 वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरात तब्बल चार ते पाच फूटहून अधिक पाणी साचले आहे. दुसरीकडे वडाळा स्टेशन परिसरातही पाणीच-पाणी झाले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी अकरानंतर धीम्या गतीने सुरू होती.
मुसळधार पावसामुळे दादर, वडाळा आणि नायगाव परिसरात पाणी साचले आहे. वडाळा स्थानक परिसरात असलेल्या चार रस्ता परिसरावर सकाळी 11 वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. या परिसरात तब्बल चार ते पाच फूटहून अधिक पाणी साचले आहे. दुसरीकडे वडाळा स्टेशन परिसरातही पाणीच-पाणी झाले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी अकरानंतर धीम्या गतीने सुरू होती. त्यानंतर ती बंद करण्यात आली आहे. नायगाव, परळ या परिसरातीही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर याच पट्ट्यात असलेल्या टाटा रुग्णालयासमोर तसेच केएम हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आंबेडकर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे.