मुंबई- शहर आणि उपनगरात दोन दिवसांपूर्वी पावसामुळे हाहाकार निर्माण झाला होता. त्यानंतर पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, आज (शनिवार) मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
MUMBAI RAIN: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर, उपनगरात पावसाची पुन्हा एन्ट्री
मुंबई शहर परिसर, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, बोरिवली या उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आदी भागांतही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यांवर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहितीही मिळत आहे.

मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी तुटून पडली. त्यामुळे काही काळ लोकल सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, फांद्या काढल्यानंतर पुन्हा लोकल सेवा सुरु झाली. भिवंडी परिसरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. नागरिकांना पाण्यातून रस्ता काढत वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. तसेच पुढील दोन तासांस मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.