महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Orange Alart : पुढचे काही तास धुंवाधार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी - mumbai police vigilant

मुंबईत मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Mumbai ) सुरू आहे. पुढील काही तास हा पाऊस असाच मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट ( orange alart by Meteorological Department ) जारी केला आहे. रविवारीही मुंबईत मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत समुद्राला देखील उधाण आले असून किनाऱ्यावरती उंच लाटा येत आहेत. चौपाटीवर लाटा बघण्यासाठी गर्दी होत आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस प्रशासनही सतर्क ( mumbai police vigilant ) झाले आहे.

orange alart
orange alart

By

Published : Jun 20, 2022, 6:27 PM IST


मुंबई -मुंबईत रविवारपासून सुरू झालेला मान्सूनचा पहिला जोरदार पाऊस ( Heavy Rain In Mumbai ) आज सोमवारी देखील सुरू आहे. आठवडाभर दररोज हलका ते मध्यम पाऊस पडत होता, मात्र रविवारी शहरात मोसमातील पहिल्या दमदार पावसाची नोंद झाली. सध्या मुंबईतील किंग सर्कल, चेंबूर, दादर, परळ आदी भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईतील अनेक भागात दृश्यमानता कमी आहे. त्यामुळे हवामान विभागाने 20 आणि 21 जूनसाठी ऑरेंज अलर्ट (orange alart by Meteorological Department) जारी केला आहे.

मुंबई आणि लगतच्या भागात ऑरेंज अलर्ट -हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, "आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि इतर लगतच्या भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पुढचे दोन दिवस विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुढील 2 दिवसांत मुंबईत साधारण 130 मिमी पावसाची शक्यता आहे. हे पर्जन्यमान मुंबईच्या दृष्टीनं फार नाही. पण, इतक्या पावसामुळे मुंबईत पाणी साचू शकतं."

मुंबई गारेगार -आज मुंबईतील सांताक्रूझमध्ये किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कुलाबा येथे आज किमान तापमान 23 अंश तर कमाल तापमान 28 अंश राहण्याची शक्यता आहे. तर बोरिवलीमध्ये आज किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. IMD नुसार शहरात 20 जून ते 23 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. यानंतर हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

समुद्रला उधाण -सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत समुद्राला देखील उधाण आले असून किनाऱ्यावरती उंच लाटा येत आहेत. या लाटांमुळे मुंबईतल्या चौपाटी परिसरात पर्यटकांची देखील गर्दी वाढली असून या समुद्राच्या लाटा अंगावर झेलण्यासाठी अनेक पर्यटक दादर चौपाटी, मारिन लाईन्स तसेच गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून मुंबई पोलीस देखील किनारी भागात सतर्क झाले आहेत.

हेही वाचा -Supreme Court : नवाब मलिक, अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका; मतदान करताच येणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details