मुंबई - गणोशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी एसटीने जय्यत तयारी केली होती. त्यानुसार मुंबई, ठाणे व पालघर या तीन विभागातून 23 बसेस आज सोडण्यात येणार होत्या. परंतु, मुंबईसह कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. अतिवृष्टीमुळे या बसेसना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कोकणात आज जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबईत अतिवृष्टी, गणपती उत्सवाला एसटीने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना फटका - मुंबई पाऊस बातमी
मुंबई आणि ठाणे विभागातून प्रत्येकी दोन, अशा चार बसेस आज मार्गस्थ करण्याचे नियोजन होते. मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे-माणगाव आदी ठिकाणी पाणी साचल्याने सदरची वाहतूक आजच्यासाठी बंद करण्यात आली आहे. उद्या पावसाचा अंदाज घेऊन पुढची वाहतूक करण्यात येणार आहे.
मुंबईत अतिवृष्टी

तत्पूर्वी काल रात्रीपासून व्यक्तिगत आगाऊ आरक्षणाला सुरुवात झाली आहे. गट आरक्षणासाठी (ग्रुप बुकिंग) संबंधित प्रतिनिधींनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.