मुंबई -राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला नसला तरी रिमझिम पाऊस अधून-मधून सुरू आहे. मात्र, पुढील चार-पाच दिवसांत पावसाचा जोर वाढला, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे. राज्यात अनेक ठिकाणी कडकडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, पालघर, ठाणे या भागात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात -
उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या दोन जिल्ह्यांत उद्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर पुढील काही तासात वाढणार आहे.
हेही वाचा -राजकारण करताना जनतेच्या जीवाशी खेळू नका; घंटानाद आंदोलन करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी झापले
परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना 6 आणि 7 सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 8 सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.