मुंबई - शहर आणि उपनगरात सध्या पाऊस ओसरला आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत आहे. विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत होत असले तरी ढग दाटून आले आहेत. कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. समुद्र किनारी उंच लाटा उसळत आहेत, याबाबतची माहिती मुंबई हवामान विभागाने दिली आहे. सध्या समुद्र खवळलेला राहणार आहे.
मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र कोणत्याही क्षणी सुरू होणार मुसळधारा - mumbai rain
मुंबईत विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरळीत होत असले तरी ढग दाटून आले आहेत. कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
![मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र कोणत्याही क्षणी सुरू होणार मुसळधारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3713806-thumbnail-3x2-hjds.jpg)
मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची मुसळधार सकाळपर्यंत कायम होती. मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. अंदाजाप्रमाणे मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसला. परिणामी मुंबईतील रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. समुद्राला साधारण बाराच्या सुमारास भरती होती, उंच लाटा समुद्रकिनारी पाहण्यास मिळत आहेत. मुंबईकर याचा समुद्रकिनारी बसून आनंद लुटत आहेत. शहर व उपनगरात थांबून- थांबून तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण-गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २ व ३ जुलैला गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ जुलैला कोकण-गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण व गोव्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.