महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले, मुंबईकरांनी रात्र जागून काढली - waterlogged

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्र जागून काढावी लागली.

Heavy downpour in Mumbai, major areas of city waterlogged
मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले, मुंबईकरांनी रात्र जागून काढली

By

Published : Jul 18, 2021, 5:09 AM IST

मुंबई - हवामान विभागाने मुंबईत रात्री तीन तासात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्र जागून काढावी लागली. रात्री तीन नंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

या ठिकाणी साचले पाणी -
शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री १२ ते ३ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. काल शनिवारी रात्री ८ ते मध्यरात्रीच्या २ वाजेपर्यंत सहा तासात शहर विभागात १५६.९४, पूर्व उपनगरात १४३.१४, पश्चिम उपनगरात १२५.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सहा तासात शंभर मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्याने ब्रीच कॅंडी, भांडुप, भायखळा, आग्रीपाडा, ग्रँट रोड, जेजे हॉस्पिटल, हिंदमाता, किंग सर्कल, लालबाग, माटुंगा, मुलुंड, परेल, माहीम, नळ बाजार, साकी नाका, अंधेरी, सायन, बांद्रा आदी बहुतेक सर्वच सखल भागात पाणी साचले.

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले
रात्र जागून काढली -सखल भागात एकीकडे पाणी साचले असताना अशा विभागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. बांद्रा भारत नगर, अंधेरी मोगरा पाडा आदी ठिकाणी रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने हे पाणी काढण्याचे काम रहिवाशांना रात्रभर करावे लागले. यामुळे मुंबईकरांना रात्र जागून काढावी लागली. सायन रेल्वे स्थानकातही पाणी भरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details