मुंबई - मुंबईकर प्रवाशांसाठी बेस्टकडून कालपासून बससेवा सुरू करण्यात आली आहे. बेस्टमध्ये चढताना गर्दीचा परराज्यातील व्हीडिओ अलव्हायरल झाला आहे. त्यानंतर आज मुंबईत दुसऱ्या दिवशी बसच्या स्थितीचा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने आढावा घेतला.
मुंबईत बेस्ट बससाठी प्रवाशांची गर्दी, कंडक्टरकडून घेतली जातेय काळजी
बस आल्यावर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी सामाजिक अंतर न पाळता घोळका करून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील कंडक्टरने वेळीच सावध होत, अधिक प्रवाशांना प्रवेश नाकारला.
मुंबईचा मध्यवर्ती भाग व सतत गजबजलेल्या दादरच्या प्लाझा परिसरातून जाणाऱ्या व येणाऱ्या बसेसचा आढावा घेण्यात आला. यावेळी बसस्थानकावर काही प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसली.
बस आल्यावर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी सामाजिक अंतर न पाळता घोळका करून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील कंडक्टरने वेळीच सावध होत, अधिक प्रवाशांना प्रवेश नाकारला. त्यामुळे मुंबईत सध्या तरी बसमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र नसून बसच्या आत प्रवासी सामाजिक अंतर पाळत असल्याचे दिसले.