मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयाने यावर आज सोमवार (दि. 12 डिसेंबर)रोजी सुनावणी ( Hearing On Shiv Sena Symbol ) झाली. दरम्यान, दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार ( Hearing In First Week Of January ) असल्याची माहिती खासदार अनिल देसाईंनी दिली.
धनुष्यबाण चिन्ह गोठवले :शिवसेनेतील वादावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नेमकी शिवसेना कोणाची? या प्रश्नावर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासंबधी याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे 29 नोव्हेंबरला ही सुनावणी होणार होती. परंतू काही कारणास्तव ही सुनावणी लांबणीवर ( Shiv Sena Bow And Arrow Symbol Frozen ) पडली.
ठाकरे गटाचे प्रतिनीधी उपस्थित :मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना आपली लिखित बाजू मांडण्यास सांगितले. दोन्ही पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयाकडून तीन आठवड्यांची मुदत दिली. शिवसेना आणि शिंदे गटाच्या पक्षचिन्हाच्या हक्कावर आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगात सुनावणी झाली. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे प्रतिनिधी या सुनावणीच्या वेळेस निवडणूक आयोगात उपस्थित होते. वकिलांसह ठाकरे गटाचे नेते, खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शिंदे गटाकडून वकिलां व्यतिरिक्त कुणीही यावेळी हजर नव्हते. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी ही जानेवारी महिन्यात होणार आहे, पहिल्या आठवड्यात यावर चर्चा होणार आहे, कोणत्या पक्षाने किती सदस्यांनी माहिती दिली, किती कागदपत्र सादर केली, याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.