महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात खर्च झालेल्या रकमेची आयकर विभागाद्वारे चौकशी होणार? - याचिकेवर 16 डिसेंबर रोजी सुनावणी

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यात खर्च झालेल्या रकमेची आयकर विभागाद्वारे (Income Tax department) चौकशी व्हावी, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 16 डिसेंबर रोजी सुनावणी (Hearing on petition) होणार आहे.

Mumbai
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात खर्च झालेल्या रकमेची आयकर विभागाद्वारे चौकशी होणार?

By

Published : Nov 23, 2022, 10:41 PM IST

मुंबई:शिंदे गटाकडून साजरा करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याकरिता ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांना आणण्याकरिता परिवहन महामंडळाच्या बसेस बुक करण्यात आल्या होत्या. त्याकरिता देण्यात आलेली 10 कोटी रक्कम ही अज्ञात व्यक्तींकडून जमा करण्यात आली होती. या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत आयकर विभागाच्या (Income Tax department) मार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. याचिकेवर 16 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

याचिकेत नक्की काय?शिंदे गटाने एसटी महामंडळाला दिलेली 10 कोटींची रक्कम कुठून आली? याबाबत विचारणा याचिकेतून करण्यात आली आहे. वरिष्ठ वकील नितीन सातपुते (Senior Advocate Nitin Satpute) यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. बीकेसीतील सभेसाठी नागरिकांना आणण्यासाठी एसटी महामंडळाला दिलेल्या 10 कोटी निधीचा स्त्रोत काय? असा सवाल याचिकेत विचारण्यात आला आहे. तसेच या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

परिवहन महामंडळाकडे देण्यात आलेली रक्कम ही अज्ञात व्यक्तींकडून स्वीकारण्यात आली आहे. तसेच या व्यक्तीविरोधात आर्थिक गैरव्यवहार (Financial malfeasance) आणि आयकर विभागाच्या कलम 68 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच राजकीय हेतूच्या करिता सर्वसामान्य लोकांना यामधून त्रास सहन करावा लागला आहे. एसटी महामंडळाच्या शेकडो बसेस बुक केल्याने ग्रामीण भागामध्ये प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल देखील झाले होते. परिवहन महामंडळ हे सार्वजनिक वाहतुकीचे स्तोत्र आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांवर परिणाम झाला असल्याचे देखील याचिकेमध्ये वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांनी म्हटले आहे.

5 ऑक्टोबर रोजी झालेल्या दसरा मेळाव्यानंतर गुरुवार दिनांक सात उंबर रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात पत्रकार परिषद घेत चौकशीची मागणी केली होती. परिवहन महामंडळ एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून एवढी मोठी रक्कम कशा प्रकारे स्वीकारू शकतो. असा प्रश्न देखील विरोधी पक्षनेते विधान परिषद अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details