महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kundan Shinde: अनिल देशमुखांचे खाजगी पीए कुंदन शिंदेंच्या जामिन अर्जावर 8 डिसेंबर रोजी सुनावणी - सचिन वाझे

शंभर कोटी कथित वसुली प्रकरणातील आरोपी कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आठ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित झाले आहे.

Kundan Shinde
अनिल देशमुखांचे खाजगी पीए कुंदन शिंदेंच्या जामिन अर्जावर 8 डिसेंबर रोजी सुनावणी

By

Published : Nov 23, 2022, 8:58 PM IST

मुंबई: कुंदन शिंदे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी पीए होते. सीबीआयच्या (CBI ) वतीने दाखल करण्यात आलेल्या शंभर कोटी कथित वसुली प्रकरणातील कुंदन शिंदे हे आरोपी क्रमांक 3 आहे. ईडीच्यावतीने आरोप पत्रामध्ये कुंदन शिंदे यांच्या संदर्भात असेल म्हटले आहे की सचिन वाझे यांना मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. हे निर्देश अनिल देशमुख यांनी कुंदन शिंदे यांना दिले होते असा CBIच्या वतीने आरोप पत्रात म्हटलेले आहे.


काय आहे प्रकरण?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. कुंदन शिंदे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाला CBI ने विरोध केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details