मुंबई: धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासाठी ठाकरे गटाने पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी गोठवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला अंतरिम आदेश बेकायदा असून हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती ठाकरे गटाने केली. त्यावर संबंधित प्रकरणी लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्याबाबत स्पष्ट संकेत उच्च न्यायालयाने दिले. दोन्ही पक्षकारांनी लेखी स्वरूपात ठळक मुद्दे मांडावेत, असं न्यायालयाने सांगितलंय. ठाकरे गटाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावाबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन्ही गटाकडून कागदपत्रे मागवली होती. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल दिला होता.