महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Measles Patients : गोवर बाधित बालकांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा सूचना...

लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणे वाढत असल्याने सर्वाधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत ( Health Minister Tanaji Sawant ) यांनी केले. काही भागात लसीकरण करण्याविषयी जनजागूर्ती करण्यात येत असल्याचे मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या बालकाला गोवर झालेला आहे, त्याला स्प्रेडर होऊ नये, यासाठी त्याला सात दिवस विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि आशा वर्कर यांना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Tanaji Sawant
तानाजी सावंत

By

Published : Nov 30, 2022, 5:56 PM IST

मुंबई : राज्यात गोवरचा संसर्ग वाढला असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर गोवर बाधित ( Infected with measles ) बालकांना सात दिवस विलगीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत ( Health Minister Tanaji Sawant ) यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व कामासाठी 800 पेक्षा जास्त लोकांची टीम कार्यरत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सावंत यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत घेऊन, गोवर रुग्णांचा आढावा घेतला.

काळजी घेण्याचे आवाहन - पत्रकार परिषदेत मंत्री सावंत म्हणाले की, मुंबईसह राज्यातील अनेक भागांत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीकरणावर भर दिला जात आहे. गोवरमुळे आजवर 14 बालके दगावली आहेत. पैकी एका बालकाचे लसीकरण झाले नव्हते. त्यामध्ये 6 मुली आणि 8 मुलांचा यात समावेश आहे. लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणे वाढत असल्याने सर्वाधिक काळजी घेण्याचे आवाहन तानाजी सावंत यांनी केले. मागील पंधरा दिवसांत मुंबई आणि काही ठराविक भागात गोवर वाढत आहे. या गोवरची सुरूवात मुंबईत झाल्याचे मंत्री सावंत म्हणाले.

सात दिवस विलगीकरण - वाढत्या गोवरच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाची मंत्रालयात सातत्याने बैठका होत आहेत. उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत. गोवर बाधित रुग्णांची स्वतः हॉस्पिटल मध्ये जाऊन देखभाल केल्याचे सावंत यांनी सांगत, गोवर प्रभावित भागात एकूण कार्यरत 825 सर्वेक्षण पथक आहेत. आतापर्यंत 9 लाख 80 हजार 883 घरांचे सर्वेक्षण केले. गोवरच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्राची बैठक पार पडली. सर्वाधिक जास्त गोवर बाधित होते. आशा वर्कर देखील काम करत आहेत. काही भागात लसीकरण करण्याविषयी जनजागूर्ती करण्यात येत असल्याचे मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या बालकाला गोवर झालेला आहे, त्याला स्प्रेडर होऊ नये, यासाठी त्याला सात दिवस विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि आशा वर्कर यांना दिल्या आहेत, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.

गोवरचा उद्रेक 68 ठिकाणी - खाजगी रुग्णालयातील बालकांची देखील माहिती सरकारी कार्यालयात कळवणे बंधनकारक असणार आहे. गोवरची लाट जानेवारीपर्यंत कमी प्रमाण होईल असा अंदाज आहे. सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप तथ्यहीन आहेत. गोवर कोरोना पेक्षा जास्त स्प्रेड होतोय, हे असे दिसत नाही. गोवरचा उद्रेक 68 ठिकाणी झाला आहे. आपली आरोग्य यंत्रणा सक्षम असून लसीकरणावर पुरेपूर भर दिल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले.

विशेष अभियान राबविणार - माता सुरक्षित, घर सुरक्षित अभियान नवरात्रीच्या अगोदर हे अभियान राबवले. आजवर 4 कोटी 12 लाख 81 हजार 500 महिलांचे सर्वेक्षण झाले आहे. दररोज 8 लाख महिलांची तपासणी केली जाते. स्क्रिनिंग टेस्ट झाली आहे. महिलांचे सदृढीकरण करणे खऱ्या अर्थाने सुरू होईल. या नंतर 18 वर्षापर्यंत मुलांसाठी अभियान राबवणार आहोत. हे सर्वेक्षण पूर्ण करून वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर उपाययोजना सुरु होतील. तसेच कोरोना काळात मुलांमध्ये काही मानसिक विकार तर नाहीत ना, याबाबत तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नियुक्त केली जाईल. संपूर्ण सर्वेक्षण झाल्यास अहवाल तयार केला जाईल, डॉ. सावंत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details