कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही - राजेश टोपे - राजेश टोपेंची व्हायरल ऑडिओ क्लिप
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप फिरत आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी लावावी लागेल. तसेच जे नागरिक कोरोनाचे नियम पाळत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी लागेल, असा संदेश या कथित ऑडिओ क्लिपमधून देण्यात आला आहे.
मुंबई- "टाळेबंदी पुन्हा करावी लागेल, नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसतील तर दंडात्मक कारवाई करा", असे सांगणारी ऑडिओ क्लिप माझी नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्य शासनाकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप फिरत आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी लावावी लागेल. तसेच जे नागरिक कोरोनाचे नियम पाळत नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी लागेल, असा संदेश या कथित ऑडिओ क्लिपमधून देण्यात आला आहे. मात्र, आपण असा कोणताच संदेश ऑडिओ क्लिपद्वारे दिलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप माझी नाही, असे स्पष्टीकरण मंत्री टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले.