महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महानायक अमिताभ बच्चन लवकर यातून बाहेर पडावेत' - अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना ताप व खोकला असल्याचे त्यांची त्यांच्या कुटुंबियांसह अँटेजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आली होती. यात बच्चन पिता-पुत्राला कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या कुटुंबियांचे अहवाल येणे बाकी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Jul 12, 2020, 2:24 AM IST

Updated : Jul 12, 2020, 6:49 AM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिनेते अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना ताप आणि खोकला असल्याने रुग्णलयात दाखल करावे लागल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बच्चन कुटुंबियांची अँटेजियन रॅपिड टेस्ट केली आहे. त्यापैकी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर जया बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या चाचणीचा अहवाल रविवारी (दि.12 जुलै) येण्याची अपेक्षा असल्याचे टोपे म्हणाले.

बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉ. पाटकर यांनी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती लवकर सुधारावी तसेच ते लवकर कोरोना मुक्त व्हावेत, आशी आमची सदिच्छा असल्याचे ही टोपे म्हणाले. त्याच बच्चन यांच्या ट्विटबाबत सांगत मंत्री टोपे म्हणाले, बच्चन यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी मागील दहा दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे, त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी क्वारंटइन व्हावे व चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे.
Last Updated : Jul 12, 2020, 6:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details