मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्व खबरदारी घेत असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे टोपे म्हणाले. मुंबई आणि पुण्यामध्ये 2 संशयित रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे टोपे म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेतेय योग्य ती खबरदारी
जगभरात हजारोंचा बळी घेऊन आर्थिक संकट निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूची चिंता आता भारतालाही लागली आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाचे 2 संशयित रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्व खबरदारी घेत असल्याचेही टोपे यावेळी म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे
दिल्ली आणि तेलंगणामध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाबरण्याची गरज नाही, मात्र, योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे टोपे म्हणाले. मुंबई आणि पुण्याच्या रुग्णांचे स्वेब टेस्ट आज येणार आहेत. हेल्थ वर्करसाठी मास्क, 10 वेगळे वॉर्ड ठेवण्यात आले आहेत. तसेच पुरेस मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे टोपे म्हणाले.