मुंबई- राज्याच्या कोरोनासाठीच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता त्यांची तब्येत बरी असल्याची माहिती मिळत आहे.
टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक यांना डिस्चार्ज...रक्तदाबाचा होता त्रास
डॉ.ओक यांना दोन दिवसांपूर्वी रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना माझगाव येथील त्यांच्याच प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांची तब्येत सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आहे.
टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक यांना डिस्चार्ज
डॉ.ओक यांना दोन दिवसांपूर्वी रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना माझगाव येथील त्यांच्याच प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांची तब्येत सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आहे. कामाच्या ताणामुळे त्यांना हा त्रास झाल्याचेही म्हटले जात आहे.