मुंबई:कथित आरोपी आकाश हा परभणीहून पुण्याला रोजगाराच्या शोधात आला. पुण्यात आल्यावर त्याची ओळख करण कांबळेशी झाली. कथित आरोपी हा पुण्यातील ज्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहत होता. त्याच्या बाजूलाच काही अंतरावर करण कांबळे नावाचा तो व्यक्ती होता. त्याचे गॅरेज/ कम भंगार दुकान त्या ठिकाणी होते आणि त्याच्या गॅरेजवर हा गेला. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी गॅरेज मालक करण कांबळेने आकाश विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यात आरोप आहे की, आकाश याने गॅरेजवर दरोडा घातला आणि एपल फोन आणि सोन्याचे दागिने गॅरेज मधून लंपास केले. तर आरोपीचे म्हणणे आहे की, तो निर्दोष आहे. त्यामुळे हा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला.
Robbery Charges On Youth: रोजगाराच्या शोधात पुण्यात आला आणि दरोड्याच्या आरोपात अडकला - रोजगाराच्या शोधात पुण्यात
आरोपी आकाश हा परभणी येथून पुण्यामध्ये रोजगाराच्या शोधासाठी आला. ज्या ठिकाणी राहायला लागला त्या बाजूलाच कांबळे नावाच्या व्यक्तीचे गॅरेज होते. त्या गॅरेजला आकाश या तरुणाने एक दोन वेळा भेट दिली. नंतर गॅरेजवर दरोडा पडला आणि गॅरेज मालकाने आकाशवर आरोप ठेवला की, आकाश यानेच गॅरेजवर दरोडा टाकला; परिणामी पोलिसांच्या तापसांती पुणे सत्र न्यायालयाने उपलब्ध तथ्य आधारे आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. आहे. मात्र आरोपीचे म्हणणे आहे की, तो निर्दोष आहे. त्यामुळे आता न्याय मिळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
आरोपीची उच्च न्यायालयात धाव: घटना 11 जुलै 2022 ला घडली आणि त्याबाबतचा गुन्हा 13 जुलै 2022 रोजी पुण्यामध्ये नोंदवला गेला. आणि त्यामुळे सदर आरोपीवर जो दरोडा घालण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सदर आरोपीला पुण्यातील सत्र न्यायालयाने येरवडा तुरुंगामध्ये त्याची रवानगी केली. मात्र आरोपी गायकवाड याचे म्हणणे आहे की, तो स्वतः निर्दोष आहे. इतरांनी दरोडा घातला. पण त्याचा काही संबंध नाही. तसेच आरोप पत्रामध्ये आकाश याचे नाव देखील नमूद केलेले नाही. मात्र गॅरेज मालक कारण कांबळे याने ज्या रीतीने आरोपीचे वर्णन केले ते वर्णन या आकाश बाबत जुळते. म्हणून पोलिसांच्या तपासणीमध्ये त्याच्यावर आरोप ठेवला गेला आणि आरोपीवर 395 भारतीय दंडविधान कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच 364 आणि 386 या प्रकारचे गुन्हे ठेवून त्यावर आरोप करण्यात आला. आरोपी आकाश सोबत इतर सात व्यक्तींवर देखील गुन्हा नोंदवला गेला आहे. आरोपी आकाश याचे म्हणणे आहे की तो अत्यंत गरीब कुटुंबातला आहे. त्याच्यावर सर्वस्वी गावातील घर आणि त्यांचे जगणे अवलंबून आहे. तो निर्दोष आहे आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी आकाशची असल्याने म्हणून उच्च न्यायालयामध्ये त्याचे वकील गडसिंग यांनी आता धाव घेतलेली आहे.
हेही वाचा:Tree Falling On Temple : वाऱ्यामुळे झाड मंदिरावरील टीनेवर पडले; 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची भीती