महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येस बँक घोटाळा; उच्च न्यायालयाने वाधवान बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला - येस बँक घोटाळा आरोपी न्यूज

येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणी, अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) येस बँकेचे संस्थापक राणा कपूर व डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची 2 हजार 203 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने वाधवान बंधूंचा जामिन अर्ज फेटाळला आहे.

Yes Bank scam
येस बँक घोटाळा

By

Published : Nov 5, 2020, 12:53 PM IST

मुंबई - येस बँक घोटाळ्या प्रकरणी आरोपी असलेले दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे(डीएचएफएल) प्रमुख कपिल वाधवान व धीरज वाधवान यांची जामीन याचिका उच्च न्यायलयाने फेटाळली आहे. 3 हजार 700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोघांनी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या जामीन याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. कोतवाल यांच्यासमोर झाली.

सीबीआयच्या आरोपत्रात त्रुटी; याचिकाकर्त्यांचा दावा -

सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातमध्ये सीआरपीसीच्या अंतर्गत येणाऱ्या नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. त्यांच्या आरोपपत्रात अनेक त्रूटी असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील अमित देसाई यांच्याकडून न्यायालयामध्ये करण्यात आला होता. यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. सीबीआयकडून या घोटाळ्यासंदर्भातील आरोप पत्र हे कलम 173 सीआरपीसीच्या अंतर्गत दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास अजूनही सुरू आहे. त्याचा चौकशी अहवाल लवकरच न्यायालयामध्ये सादर केला जाईल, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.

काय आहे प्रकरण -

येस बँकेकडून तब्बल 3 हजार 700 कोटी रुपयांचा शॉर्ट-टर्म डिबेंचर एप्रिल 2018ला डीएचएफएलमध्ये गुंतवण्यात आले होते. यासाठी वाधवान बंधूंकडून बँकेचे प्रमुख राणा कपूर यांना 600 कोटी रुपयांची रक्कम मोबदला म्हणून देण्यात आल्याचे सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. यानंतर येस बँक डबघाईला आल्यामुळे आर्थिक संकटात सापडली होती.

वाधवान बंधू आणि राणा कपूरची संपत्ती झाली आहे जप्त -

येस बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली असून भारतातील व परदेशातील तब्बल 2 हजार 203 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. ही संपत्ती येस बँकेचे संस्थापक राणा कपूर व डीएचएफएल चे कपिल वाधवान व धीरज वाधवान यांच्या मालकीची असल्याचे समोर आलेला आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची मुंबई, दिल्ली, पुणे येथील 792 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात खुर्शीदाबाद येथील आलिशान इमारत, मुंबईतील कंबाला हिल येथील घर, नेपियांसी रोड येथील घर, त्याचप्रमाणे नरिमन पॉइंट येथील आलिशान फ्लॅट, वरळी इंडियाबुल्स येथील 8 फ्लॅटचा समावेश आहे. याबरोबरच दिल्लीतील अमृत शेरगिल मार्गावरील तब्बल 685 कोटी रुपयांची किंमत असलेला बंगलासुद्धा ईडीकडून जप्त करण्यात आलेला आहे. डीएचएफएलचे कपिल वाधवान, धीरज वाधवान, यांची तब्बल 1 हजार 411 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये मुंबईतील खार परिसरातीलब 12 आलिशान फ्लॅट्सचा समावेश आहे. परदेशातील न्यूयॉर्कमधील एक फ्लॅट, लंडनमधील दोन फ्लॅट, याबरोबरच पुण्यातील जमीनसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. शिवाय कमर्शियल प्रॉपर्टी आणि काही महागड्या गाड्यांसह, 344 बँक अकाऊंटसुद्धा ईडीकडून जप्त करण्यात आलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details