महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

HC Order To Child Welfare Committee : बालसुधार गृहात पाठवलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याचा ताबा मावशीकडं द्या - हायकोर्ट

HC Order To Child Welfare Committee : आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर बालकल्याण समितीनं सात वर्षाच्या चिमुकल्याला बालसुधार गृहात पाठवलं होतं. मात्र त्याच्या मावशीनं या मुलाचा ताबा आपल्याकडं देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयानं बालकल्याण समितीला चांगलचं फटकारलं आहे.

HC Order To Child Welfare Committee
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 12:33 PM IST

मुंबई HC Order To Child Welfare Committee : आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चिमुकल्याला बालसुधार गृहात पाठवणाऱ्या बालकल्याण समितीला मुंबई उच्च न्यायालयानं चांगलच फटकारलं. या मुलाचा ताबा 48 तासाच्या आत त्याच्या मावशीकडं देण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयानं ( Bombay High Court ) बुधवारी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या न्यायालयानं बालकल्याण समितीला फटकारलं आहे. या चिमुकल्याच्या आईचा दुबईत मृत्यू झाला होता. तर वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता.

चिमुकल्याच्या आईचा दुबईत झाला मृत्यू :सात वर्षाच्या चिमुकल्याची आई दुबईमध्ये असताना 2021 मध्ये तिथच अचानक मृत्यू झाला. आईचा दुबईत मृत्यू झाल्यामुळे लहान चिमुकला त्याच्या वडिलांसोबत मुंबईत परतला. हे दोघंही त्यानंतर गोव्यामध्ये राहायला गेले. परंतु काही काळानंतर आजी-आजोबा आणि त्याची मावशीदेखील त्यांच्यासोबत राहू लागले. चिमुकला चार वर्षाचा असताना त्याच्या मावशीनं त्याचा सांभाळ केला. त्यामुळे त्याच्या वडिलांनी चिमुकल्याच्या मावशीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्न होण्याअगोदरच झाला वडिलाचा मृत्यू :चिमुकल्याच्या मावशीसोबत वडिलाचं लग्न करण्याचं त्यांच्या कुटुंबियांनी ठरवलं होतं. मात्र मावशीचा अगोदरचा घटस्फोट झाला नसल्यानं त्यांना लग्नासाठी वाट पाहावी लागली. त्यानंतर या चिमुकल्याच्या मावशीचा मे 2023 मध्ये घटस्फोट झाला. मात्र त्याच्या वडिलांचा जुलै 2023 मध्ये अपघातात मृत्यू झाल्यानं हा चिमुकला पुन्हा पोरका झाला.

चिमुकला बालसुधार गृहात :अगोदर आई दुबईत मृत झाली, त्यानंतर वडिलांचाही अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे चिमुकल्या मुलाला कोणाचा आधार उरला नाही. याबाबत बालकल्याण समितीनं मुलाला बालसुधार गृहात पाठवण्याचा निर्णय घेतला.

मावशीनं दाखल केली याचिका :या चिमुकल्याची आई दुबईत मृत झाल्यानंतर त्याचा संभाळ त्याच्या मावशीनं केला होता. त्यानंतर त्याच्या वडिलांना आणि मावशीला लग्नही करायचं होतं. मात्र काळानं वडिलांवर घाला घातल्यानं त्यांचा विवाह होऊ शकला नाही. मात्र बालकल्याण समितीनं मुलाचा ताबा माझ्याकडं द्यायला हवा होता, असा दावा त्याच्या मावशीनं केला आहे. चार वर्षाचा असताना मी चिमुकल्याचा सांभाळ केलेला आहे. परंतु बालकल्याण समितीने मनमानी पद्धतीनं मुलाचा ताबा घेतला आहे. म्हणूनच तो ताबा माझ्याकडं द्यावा, असा दावा त्याच्या मावशीनं करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयानं 48 तासात ताबा देण्याचे दिले आदेश :या चिमुकल्याच्या मावशीनं दाखल केलेली याचिका ग्राह्य धरत न्यायालयानं मान्य केली. या महिलेचा दावा न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी मान्य करत बालकल्याण समितीला 48 तासात त्या बालकाचा ताबा सांभाळ करणाऱ्या मावशीकडं देण्याचा आदेश दिला.

हेही वाचा :

  1. Bombay High Court : तुम्ही बापाचंही नाव बदलू शकता, हायकोर्टाचा निर्णय; एनएमसीला दणका
  2. Bombay High Court : भारतातील आईनं अमेरिकेतल्या वडिलांकडे 15 दिवसात द्यावा मुलाचा ताबा, उच्च न्यायालयाचा आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details