महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

High Court : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरील याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Mumbai Municipal Corporation

महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरील (ward formation BMC) याचिकेवर राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाेने निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महापालिका प्रभाग संख्या 236 केली होती. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने रद्द करत पूर्वीची 227 प्रभाग रचना कायम केली आहे. याविरोधात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Mumbai
मुंबई

By

Published : Nov 17, 2022, 1:22 PM IST

Updated : Nov 17, 2022, 5:11 PM IST

मुंबई -उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महापालिका प्रभाग संख्या (ward formation BMC) 236 केली होती. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने रद्द करत पूर्वीची 227 प्रभाग रचना कायम केली आहे. याविरोधात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकावर न्यायमूर्ती गौतम पाटील आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी महापालिका आणि राज्य सरकारला 25 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान,मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election) कधी जाहीर होणार हा प्रश्न आता सर्वच राजकीय पक्षांसोबत सामान्य नागरिकही विचारू लागेल आहे. यातच यंदा पालिकेची निवडणूक खूपच रंगतदार होण्याचे चिन्ह आहे. 1995 सालापासून पालिकेवर कब्जा असलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडली असून यात दोन गट निर्माण झाले आहे.

यातच ठाकरे गट यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह या निवडणुकीत उतरू शकतो. तर शिंदे गट भाजपसोबत उतरणार आहे. यातच मनसेची भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मनसे भाजप आणि शिंदे गटासोबत मिळून ही निवडणूक लढवणार का, हे देखील पाहावं लागणार आहे.

Last Updated : Nov 17, 2022, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details