महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांताक्रूझमध्ये आढळली बेवारस बॅग, परिसरात खळबळ - कलम 370 रद्द

गोपाळ कृष्ण हॉटेलमध्ये संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक बेवारस बॅग सापडली.

बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

By

Published : Aug 8, 2019, 7:48 PM IST

मुंबई- मुंबईतील सांताक्रूझ येथील गोपाळ कृष्ण हॉटेलमध्ये संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक बेवारस बॅग सापडली. त्यामुळे एकच खळबळ माजली असून परिसरात घबराट पसरली आहे. काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच ही बेवारस बॅग सापडल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.

बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

परिसरात अनोळखी बॅग दिसताच नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळी बॉम्बशोधक पथकही दाखल झाले. या पथकाने तपासणी केली असता, या बॅगमध्ये कागदपत्रे असल्याचे आढळले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ABOUT THE AUTHOR

...view details