मुंबई : भारतामध्ये दीडशे वर्षांहून अधिक काळ इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या राज्य दरम्यान मुंबई गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू बनवण्यात आली होती. ही वास्तू शंभर वर्षाहून जुनी आहे. भारतात इंग्रज व्यापारासाठी आले त्यानंतर त्यांनी भारतावर आपले राज्य केले. इंग्रजाच्या मार्गाने भारतात आले त्याच मार्गाने इंग्लंडचे पाचवे राजे जॉर्ज हे भारतात येत असताना त्यांच्या स्वागतासाठी 1911 ला समुद्र किनारी गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली होती. 1924 मध्ये या वास्तूचे बांधकाम पूर्ण करून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत ही इमारत समुद्राच्या लाटा, पाऊस, ऊन आणि थंडी याचा मारा सहन करत आहे. इमारतीच्या दर्शनी भागात भेगा पडल्या आहेत.
Gateway of India: गेटवे ऑफ इंडियाला तडे; सरकार डागडुजी करेल - केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांची माहिती - अहवाल पुरातत्त्व विभागाने राज्य सरकारकडे पाठवला
मुंबई गेटवे ऑफ इंडिया या वास्तूला तडे गेल्याचे समोर आले आहे. याबाबतचा एक अहवाल पुरातत्त्व विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. दरम्यान या ऐतिहासिक वास्तूची सरकार डागडुजी करून तिला जतन करेल, त्याची काळजी घेईल अशी प्रतिक्रिया हरदीप पुरी यांनी दिली आहे.
सरकारला अहवाल सादर:ऐतिहासिक असलेल्या गेटवे ऑफ इंडियाचे नुकतेच स्ट्रक्चर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये इमारतीला अनेक ठिकाणी भेगा गेल्याचे, वनस्पती वाढल्याचे, डोममधील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचे नुकसान झाले आहे. नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामध्ये या इमारतीच्या बाजूची तटरक्षक भिंत कोसळली होती तिची तात्पुरती करण्यात आली होती. गेटवे ऑफ इंडियाला तडे गेल्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. राज्य सरकार याबाबत आता काय भूमिका घेते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गेट ऑफ इंडियाची डागडुजी करणार: गेट ऑफ इंडिया येथे बुधवारी रात्री महिला दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी असा काही अहवाल असल्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे संबंधित विभाग या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी करून तिला जतन करेल. ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचा सरकारची प्राथमिकता असेल त्याची काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया हरदीप पुरी यांनी दिली आहे.
हेही वाचा: Maharashtra Budget 2023 पहिल्यांदाच अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प