महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Megablock - मेगाब्लॉकमुळे रविवारी हार्बर व मध्य रेल्वे सेवा राहणार खंडित - देखभाल दुरुस्तीसाठी मोठा मेगाब्लॉक

ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे स्थानक-माटुंगा-मुलुंड मार्ग अप आणि डाऊन फास्ट लाईन वेळ सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या Dn जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान Dn धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबेल.

मेगाब्लॉकमुळे रविवारी हार्बर व मध्य रेल्वे सेवा राहणार खंडित
मेगाब्लॉकमुळे रविवारी हार्बर व मध्य रेल्वे सेवा राहणार खंडित

By

Published : Nov 12, 2022, 4:15 PM IST

मुंबई- मध्य रेल्वेच्या मार्गावर ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे स्थानक-माटुंगा-मुलुंड मार्ग अप आणि डाऊन फास्ट लाईन वेळ सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या Dn जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान Dn धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबेल. ठाण्याच्या पलीकडे, जलद गाड्या Dn जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटांच्या विलंबाने त्यांच्या पोहोचतील.

ठाण्याहून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि संबंधित थांब्यावर थांबतील. नंतर या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुनर्निर्देशित केल्या जातील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशीरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर रेल्वे पनवेल-वाशी मार्ग -अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत पानवेलकडे जाणाऱ्या फेऱ्या रद्द होतील. बेलापूर-नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाही. पनवेल-बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरेगाव येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल-बेलापूर येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर-नेरुळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details