मुंबई:देशातील नावाजलेल्या अभियांत्रिकी शिक्षण संस्थेमध्ये अर्थात आयआयटी मुंबई येथे रसायनशास्त्र अभियांत्रिकी प्रथम वर्ष शिकणारा दर्शन सोळंकी हा दलित जातीमधून आलेला आहे. त्याला त्या ठिकाणी मिळालेली जातीभेदाच्या भेदभावाची वागणूक त्याच्या मृत्यूला कारण ठरल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला होता. तसेच आंबेडकर पेरिया स्टडी सर्कल या आयटीमधील विद्यार्थी संघटनेच्या वतीने देखील तसेच म्हटलेले आहे. गुजरातमध्ये दर्शन सोळंकी आणि त्याचे कुटुंब राहतात. त्याच्या काकांनी देखील आता आयआयटी मुंबईवर थेट आरोप केलेला आहे की, या ठिकाणी जातीभेदाच्या हीन वागणुकीमुळेच आमच्या मुलाचा मृत्यू झाला.
दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही दुसरी घटना:कोरोना महामारीच्या काही काळ आधी आयआयटी मुंबई येथे शिकणारा अनिकेत अंभोरे हा दलित विद्यार्थी याने देखील अशाच प्रकारे स्वतःचा जीव संपाला होता आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत जातीभेदाची वागणूक होती, असे त्यावेळेला देखील विद्यार्थ्यांनी म्हटले होते. मात्र अशा घटनांची नि:पक्षपातीपणे चौकशी होणे दुरापास्त असल्यामुळे पालक खचून जातात आणि पुढे त्या केसचा पाठपुरावा करू शकत नाही. त्यामुळेच कायद्याच्या अनुषंगाने आयआयटी मुंबई आणि स्थानिक पोलीस स्थानिक यांनी तपास करणे जरुरी आहे, असे देखील आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. आयआयटी मुंबईमध्ये एससी एसटी सेल आहे स्टुडन्ट वेलनेस सेंटर आहे त्याचा उपयोग नाही, असा आरोप मृत दर्शन सोळंकेचे काका आणि आयआयटी मुंबई मधील विद्यार्थ्यांचा केला आहे.
केवळ दलित असल्याने भेदभाव?हे दलित तरुण रिझर्वेशन कोट्यातून आलेले आहेत. यांच्याकडे दर्जा नाही यांच्याकडे क्वालिटी नाही आणि हे दलित जातीतून आलेले आहे, अशा पद्धतीचे शेरे टोमणे अनिकेत अंभोरेच्या वेळी देखील मारले गेले होते, अशी माहिती त्याच्या पालकांनी वृत्तपत्रातून दिली होती. आता याच पद्धतीने दर्शन सोळंकीचा मृत्यू झालेला आहे. मुंबई आयआयटीमधील आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल या विद्यार्थी संघटनेने म्हटलेले आहे.