मुंबई- महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुरु आहे. यातच आज सकाळी पवई येथील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागाकडे रवाना केल्या आहेत.
पवईतून पूरग्रस्तांना मदतीचा हात; नागरिकांना जीवनावश्यक वस्तू केल्या रवाना - कोल्हापूर, सांगली पूरग्रस्त मदत
महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुरु आहे. यातच आज सकाळी पवई येथील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागाकडे रवाना केल्या.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराने होत्याचे नव्हते झाले. या महापुरात बोट दुर्घटना व पुरात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. लाखो नागरिक बेघर झाले. शेती भुईसपाट झाली. दावणीच्या जनावरांना पुराच्या विळख्यात जीव गमवावा लागला. तेथील घराचे मोठे नुकसान झाले. पूरग्रस्त नागरिकांना शासन मदत आणि बचाव कार्य करतच आहे. सोबत अनेक स्वयंसेवी संस्था देखील या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. पूरग्रस्तांना आपलीही काही तरी मदत व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिक मदतीचा हात पुढे करत आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्षात मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त मदतीकरिता रक्कम समाजातील दानशूर व्यक्ती जमा करीत आहेत. पवईतील सर्व सामान्य नागरिकांनी पूरग्रस्त नागरिकांना आपणही काही तरी देणे आवश्यक आहे. याकरिता विभागातील नागरिकांनी परिसरात मदत फेरी काढून व विभागात सर्वांना समाजमाध्यमावरुन मदतीची गरज असल्याचे संदेश पाठवले होते. यातील जमा झाल्याली सर्व मदत आयआयटी मेन गेट समोरील जैन मंदिराच्या सभागृहात जमा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी पॅकेट भरण्यास व गाड्यामध्ये वस्तू चढवण्यास सहकार्य केले. यावर मदतीवर कोणत्याही प्रकारची माहिती, जाहिरात किंवा बॅनर लावण्यात आले नाही.