मुंबई :भारतात कोरोनाचा सर्वात जास्त कहर महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. यावरून भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'ठाकरे सरकारला आर्थिक गणित काहीच समजत नाही', अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जीडीपी खालावला
'मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. कोरोनाच्या काळातही महाराष्ट्राचा जीडीपी काही प्रमाणात वाढला असता; पण आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा जीडीपी खाली गेला आहे. हे जनतेच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. त्यातच आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यासाठी ठाकरे सरकारकडे कोणत्याच धोरणात्मक उपाययोजना नाहीत', अशी टीका विश्वास पाठक यांनी केली.