महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काही अटींसह मुंबईतील जिम आणि फिटनेस सेंटर्सना पुन्हा सुरुवात - Gyms started in Maharashtra

व्यामशाळा आणि फिटनेस सेंटरसाठी तयार केलेल्या एसओपीनुसार व्यायामशाळेत तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर, दर एका तासानंतर जिममध्ये वर्कआऊटसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची स्वच्छता करणे देखील बंधनकारक आहे.

जिम आणि फिटनेस सेंटर्सना पुन्हा सुरुवात
जिम आणि फिटनेस सेंटर्सना पुन्हा सुरुवात

By

Published : Oct 26, 2020, 10:57 PM IST

मुंबई- 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत हळू-हळू व्यवसाय सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शहरातील व्यायामशाळा उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे, फिटनेसबाबात आवड असलेल्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

व्यायामशाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २४ ऑक्टोबरला सुतोवाच केले होते. यात विजयादशमीच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यभरातील व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर उघडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार आज शहरातील फिटनेस सेंटर आणि व्यायामशाळा उघडण्यात आल्या.

माहिती देताना गोल्ड जिमचे व्यवस्थापक साद

व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटरसाठी तयार केलेल्या एसओपीनुसार व्यायामशाळेत तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ करणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर, दर एका तासानंतर जिममध्ये वर्कआऊटसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची स्वच्छता करणे देखील बंधनकारक आहे. शिवाय, रात्रीच्या वेळी व्यामशाळा आणि फिटनेस सेंटर बंद झाल्यानंतर पूर्णपणे स्वच्छता करावी लागेल, असेही एसओपीत नमूद आहे.

हेही वाचा-मराठा आरक्षण सुनावणीकडे राज्याचे लक्ष; सुनावणी घटनापीठासमोर होण्यासाठी सरकारची भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details