मुंबईGutkha Seized:हिरालाल वासू मंडल (वय 52), नासिर मोहम्मद यल्गार (वय 40), जमीर मन्नन सय्यद (वय 32) आणि संजय शाम खरात (वय 34) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दहा तारखेला कक्ष नऊने डी एन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 कोटी 39 लाख 18 हजार 800 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आणि तीन आरोपींना अटक केली होती. (Raj Tilak Raushan) जुहू परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत दोन ट्रक आणि कांदिवली येथून पार्क केलेला एक टेम्पो पोलिसांनी जप्त केला होता. याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 59 अन्वये गुन्हा दाखल करून इब्राहिम इनामदार (वय 30), संतोष कुमार सिंग (वय 25) आणि कलीम खान (वय 30) या तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
११ कोटींचा गुटखा गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथून केला जप्त - Gutkha Seized
Gutkha Seized: मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष नऊने पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काल रात्री उशिरा मोठी कारवाई करत अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या चार ट्रक चालकांना अटक करून चार ट्रक ताब्यात घेतले आहेत. (Traffic of Gutkha) या ट्रकमध्ये 4 हजार गोणी गुटखा पोलिसांना सापडला असून तो जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे. (Mumbai Crime Branch)
Published : Jan 12, 2024, 11:02 PM IST
आरोपींची कसून चौकशी सुरू:या तिघांच्या चौकशीत मिळालेल्या अधिकच्या माहितीवरून पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून काल उशिरा मुंबईत येणारे चार ट्रक जप्त केले आहेत. या ट्रकमध्ये 10 कोटी 73 लाख 44 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. बेकायदेशीरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या हिरालाल मंडल, नासिर यलगार, जमीर सय्यद आणि संजय खरात या चार आरोपींना अटक करण्यात आली. या चार आरोपींकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत की, हा मुद्देमाल कुठून आणला होता आणि तो मुंबईत कोणाला विकण्यासाठी देण्यात येणार होता. या गुन्ह्यात आजपर्यंत केलेला तपासात दहा कोटी बत्तीस लाख 62 हजार 900 रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा आणि त्याची वाहतूक करणारे एक कोटी 80 हजार किमतीचे सहा ट्रक असा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे.
हेही वाचा: