मुंबई Gunaratna Sadavarte On Jarange Patil:जरांगे यांच्या भाषणातून आज अरेरावीची, मग्रुरीची भाषा आणि स्वतःला पाटील म्हणून घ्यायची भाषा जाणवत होती. स्वतःला अधिकारशहा सारखे बोलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मागासलेले नसता. यावेळी तुम्ही मागासलेपणाच्या आरक्षणाला पात्र नसता. मराठा समाजाला आरक्षण द्या तसंच ओबीसीतून आरक्षण द्या, अशा प्रकारचे वक्तव्य ते भाषणात करत होते. त्यामुळे मराठी गाण्याप्रमाणे 'लावल रताळ आलं केळ' असं होत नाही. रताळं लावलं तर रताळेच उगवत असतात. मनोज जरांगे पाटील गोंधळलेले असून मराठा म्हणायचं की कुणबी म्हणून घ्यायचं असं म्हणत त्यांना सदावर्तेंनी टोला लगावला आहे. तसंच अशा प्रकारच्या दोन्ही मागण्यांना मराठा समाज पात्र ठरत नसल्याचं सदावर्ते म्हणाले आहेत. मराठा समाज मागासलेपणात येत नसल्याचं तीन आयोगानं सांगितलं आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं असून ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळणारच नसल्याचा दावाही अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
Gunaratna Sadavarte On Jarange Patil : जरांगे पाटील यांच्या सभेची गुणरत्न सदावर्तेंनी घेतली फिरकी, पवारांवरही निशाणा - जरांगे पाटलांवर गुणरत्न सदावर्ते यांचे मत
Gunaratna Sadavarte On Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं. महाराष्ट्र दौरा करत असताना अंतरवाली सराटी सभेचं नियोजन सुरू होतं. आरक्षणाच्या मुद्द्यावर शनिवारी अंतरवाली सराटी सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 10 दिवसांचं अल्टिमेटम दिलं आहे. यावर जरांगे यांची सभा ही केवळ एक जत्रा असल्याचं म्हणत अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
Published : Oct 14, 2023, 6:58 PM IST
शरद पवार जरांगे यांचे मार्गदर्शक :राजकीय वक्तव्याच्या आधारे जरांगे पाटील बोलत आहेत. आजची त्यांची सभा ही जत्रा असल्याचं अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणाले. जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना वायूगतीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांना भेटायला गेले होते. यावर देखील सदावर्ते यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजकीय वाटोळं करण्याचा प्रकार केला गेला असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच शरद पवार यांच्या राजकारणाचा वास जिथे येतो तिथे जरांगे पाटलांसारख्या जत्रा भरणारच. सारथी सारखी संस्था स्थापन केली आहे. तिला देखील पैसा देऊ शकत नाही. 'अल्टीमेटम' हे शब्द शरद पवार संस्कृतीतून आल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. जरांगे यांनी सलाईन लावून उपोषण केलं. सलाईन लावून केलेलं उपोषण विज्ञानही मानत नसल्याचं सदावर्ते म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणी 50% पेक्षा जास्त जागांची मागणी करत असेल तर 50% साठी आरक्षण रक्षक म्हणून आम्ही लढू. शरद पवार वायुगतीनं जरांगे यांना भेटायला गेले. त्यामुळे शरद पवारांनी सांगावं की ते त्यांचे मार्गदर्शक नाहीत का, असा प्रश्नही अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी यांनी उपस्थित केला.
हेही वाचा:
- Chhagan Bhujbal On Manoj Jarange : समाजासाठी जीव जाणार असेल तर... ; मनोज जरांगे पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
- Congress On Manoj Jarange Patil : दोन उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केल्याचं स्पष्ट; काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
- Manoj Jarange On Devendra Fadnavis : 'जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले...', मनोज जरांगेंची सदावर्तेंसह देवेंद्र फडणवीसांवर टीका