मुंबईGun Firing Case Chunabhatti : चुनाभट्टी भागात भरदिवसा गोळीबार केल्याचं उघडकीस आलय. (Shooting from Supremacy) गुंड सुमित येरुणकर याची साथीदारांनी हत्या केलीय. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली. पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी याविषयी माहिती दिली. अटक केलेल्या आरोपींची नावे सागर संजय सावंत (वय ३६ वर्षे), सुनील ऊर्फ सन्नी बाळाराम पाटील (वय ३७ वर्षे), नरेंद्र ऊर्फ नऱ्या गजानन पाटील (वय ४२ वर्षे), आशुतोष ऊर्फ बाबू देविदास गावंड (वय २५ वर्षे, सर्व राहणार- चुनाभट्टी) अशी आहेत.
किमान १० राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या :काल (रविवारी) दुपारी चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार इसमांनी बंदुकीचा वापर करून सहा जणांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये एका सुमित येरुणकर या इसमाचा मृत्यू झाला असून एका अल्पवयीन मुलीसह चार इसम जखमी झाले. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चुनाभट्टी येथील आझाद गली येथे किमान १० राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत गँगस्टर सुमितचा मृत्यू झाला. त्याचे दोन साथीदार रोशन लोखंडे आणि आकाश खंडागळे यांनाही गोळ्या लागल्या. याशिवाय तेथून जात असलेले मदन पाटील आणि 8 वर्षीय त्रिशा शर्मा हेही जखमी झाले. सर्व जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती स्थिर आहे.