ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साध्वी प्रज्ञासिंहला भाजपकडून तिकीट देणे चुकीचे - गुलजार आजमी - मुंबई

मालेगाव बॉम्ब स्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेक स्तरावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

गुलजार आजमी आणि साध्वी प्रज्ञासिंह
author img

By

Published : Apr 19, 2019, 3:38 PM IST

Updated : Apr 19, 2019, 4:54 PM IST

मुंबई - साध्वी प्रज्ञासिंह यांचे तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यू संदर्भात केलेले वक्तव्य म्हणजे हुतात्म्यांचा अपमान आहे. अशा उमेदवाराला भाजपकडून तिकीट देणे चुकीचे असल्याचे जमात-ए-उलेमा संघटनेचे गुलजार आजमी म्हणाले.

जमात-ए-उलेमा संघटनेचे गुलजार आजमी

हेमंत करकरे यांनी माझ्यावर केलेली कारवाई ही देशद्रोही आणि धर्मविरोधी होती. तसेच त्यांनी माझ्याबाबत चुकीचा व्यवहार केला. माझा शापामुळेच हेमंत करकरेंचे निधन झाले. दहशतवाद्यांनी करकरेंना संपवून माझे सुतक संपवले, असल्याचे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले. त्यावरच आज गुलजार बोलत होते. भाजपकडून साध्वी प्रज्ञासिंहच्या विरोधात कारवाई होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

साध्वी प्रज्ञासिंहला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांचे जामीन रद्द व्हावे, यासाठी पीडित सय्यद निसार न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह आणि एनआयए तपास यंत्रणेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण? वाचण्यासाठी इथं क्लिक करा

Last Updated : Apr 19, 2019, 4:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details