मुंबई - गुजराती व्यापाऱ्यांनीच नरेंद्र मोदींना दिल्लीच्या सत्तेवर बसवले. पण, तेच व्यापारी आता त्यांनी त्यांची जागा दाखवतील, असे वक्तव्य नुकतेच काँग्रेसवासी झालेला पाटीदार नेत हार्दिक पटेलने केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे आयोजित युवा संमेलनात तो बोलत होता.
गुजराती व्यापारी मोदींना त्यांची जागा दाखवतील - हार्दिक पटेल - hardik
भाजप गुजरातमधील एका जागेसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तेव्हा व्यापारी मला कानात येऊन म्हणाला, असे नका बोलू, भाजपने कितीही खर्च केला तरी आम्ही काँग्रेसलाच मत देणार आहोत. असे बोलून तो निघून गेला. त्यामुळे हीच वेळ आहे मोदींना जागा दाखविण्याची, असे आवाहन हार्दिकने तरुणांना केले.
हार्दिक म्हणाला की, आज मुंबईला येताना मला मुंबईत काही गुजराती व्यापारी भेटले. त्यांनी मला देशाच्या निवडणुकीवर मत विचारले. तेव्हा मी म्हणालो की, काँग्रेस निवडून येणे अवघड आहे. कारण, भाजप गुजरातमधील एका जागेसाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तेव्हा व्यापारी मला कानात येऊन म्हणाला, असे नका बोलू, भाजपने कितीही खर्च केला तरी आम्ही काँग्रेसलाच मत देणार आहोत. असे बोलून तो निघून गेला. त्यामुळे हीच वेळ आहे मोदींना जागा दाखविण्याची, असे आवाहन हार्दिकने तरुणांना केले.
यावेळी हार्दिकने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तो म्हणाला, भाजप लोकांच्या प्रश्नांवर बोलत नाही. राष्ट्रवादावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. जे लोक तरुणांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल बोलतात त्यांना देशद्रोही ठरवले जाते. त्यामुळे भाजपला सत्तेतून उलथून टाकण्याची गरज आहे. आज आपल्याला रोजगार, शिक्षण, सुरक्षा हवी आहे. यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे, असे पटेल म्हणाले. ज्या लेखकाने राजमाता जिजाऊंचा अपमान केला त्यांना या राज्यात पुरस्कार दिला जातो, असे म्हणून पटेलने फडणवीसांवरही टीकास्त्र सोडले.