महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुजरात विजयाचे श्रेय महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांना, उद्धव ठाकरेंचा टोला, 17 तारखेला विराट मोर्चाचा पुनरुच्चार - उद्धव ठाकरेंचा टोला

महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात 17 डिसेंबरला विराट मोर्चा काढण्यात येईल. हा मोर्चा विराट मोर्चा होईल असा विश्वास आहे असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यशाच्या मानकऱ्यांचे अभिनंदन. मात्र महाराष्ट्रातून ओरबाडून नेलेल्या उद्योग पळवण्यालाही या निवडणुकीतील विजयाचे श्रेय दिले पाहिजे असे ठाकरे म्हणाले.

गुजरात विजयाचे श्रेय महाराष्ट्रातून पळवून नेलेल्या उद्योगांनाही दिले पाहिजे उद्धव ठाकरेंची टीका
गुजरात विजयाचे श्रेय महाराष्ट्रातून पळवून नेलेल्या उद्योगांनाही दिले पाहिजे उद्धव ठाकरेंची टीका

By

Published : Dec 8, 2022, 5:47 PM IST

Updated : Dec 8, 2022, 7:57 PM IST

मुंबई - महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात 17 तारखेला विराट मोर्चा काढण्यात येईल. हा मोर्चा विराट मोर्चा होईल असा विश्वास आहे असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी व्यक्त केला. यशाच्या मानकऱ्यांचे अभिनंदन. मात्र महाराष्ट्रातून ओरबाडून नेलेल्या उद्योग पळवण्यालाही या निवडणुकीतील विजयाला श्रेय दिले पाहिजे असे ठाकरे म्हणाले. सातत्याने महाराष्ट्राच्या थोर पुरुषांचा महाराष्ट्राच्या दैवतांचा अवमान भारतीय जनता पक्ष करत आहे. केंद्राच्या सत्तेच्या गुर्मीमुळे महाराष्ट्राला मिळणारे उद्योगही पळवले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र द्रोही सरकारच्या विरोधात 17 तारखेला महामोर्चा काढण्यात येईल.

महाविकास आघाडीची बैठक

17 डिसेंबरला विराट मोर्चा - महापुरुषांबाबत सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने होणारी वादग्रस्त वक्तव्ये राज्यातून मोठे उद्योग इतर राज्यात जाणे आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या मुख्य मुद्द्यावरून महाविकास आघाडीमधील नेते 17 डिसेंबरला वीर माता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या नियोजनासाठी विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार झाली. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, नेते सुभाष देसाई अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, भाई जगताप असे तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यासोबतच समाजवादी पक्षाकडून रईस शेख उपस्थित होते. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून शिंदे फडणवीस सरकारवर सर्व नेत्यांनी तोफ डागली. यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकार कर्नाटक सीमा वादावर काहीही बोलत नाही याबद्दल खेद व्यक्त केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने आक्रमक भाषा बोलत आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आक्रमक होत नाहीत, असा टोला महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर राज्य सरकारला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन -गुजरात निवडणुकीत विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन केले असले तरी महाराष्ट्रातून पळवलेले उद्योग हे गुजरातच्या निवडणुकीत विजयासाठी भाजपला कारणीभूत ठरले असल्याचा चिमटा उद्धव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेतून काढला. ज्याप्रमाणे गुजरात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवण्यात आले, त्याचप्रमाणे कर्नाटक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील गावे पळवण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर महाविकास आघाडीचे खासदार अधिवेशनात आवाज उठवत आहेत. मात्र या मुद्द्यावर इतर पक्षाचे खासदार गप्प बसून राहिल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी बेळगावच्या देवाला नवस करावा -मुख्यमंत्री नवस करतात. त्यासाठी दिल्लीला आणि गुहाटीला जातात. मात्र बेळगावला मुख्यमंत्री अद्यापही जात नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर मुख्यमंत्र्यांनी बेळगावमधील एका देवाला नवस करावा. त्यासाठी त्यांनी बेळगावला जावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे यांना दिला.

स्थानिकांच्या विरोधामुळे रिफायनरीला विरोध -महाराष्ट्रात येणारी रिफायनरी उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेली असल्याचा ठपका आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नानार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा विरोध होता. त्यामुळे आपण नानार येथील रिफायनरीला विरोध केला. तसेच हा विरोध करताना जिथे महाराष्ट्रात या रिफायनरीबाबत लोकांचा विरोध नसेल तिथेही रिफायनरी नेण्यात यावी, लोकांचा विरोध नसेल तर आम्हीही विरोध करणार नाही अशी भूमिका आधीच स्पष्ट केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राला दिले जात आहेत. रांगोळी इतर राज्यांना दिली जाते. तर राख महाराष्ट्राच्या वाट्याला देत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.


महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव -महाराष्ट्रातील सुरुवातीला उद्योग गुजरातला पळवण्यात आले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करून गुजरातला जोडण्याचा डाव भारतीय जनता पक्षाचा असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला. महाराष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांना डिवचले जात आहे. मात्र राज्यसरकार गप्प आहे. त्यामुळे हा विराट मोर्चा काढला जात आहे. पण हा मोर्चा केवळ महाविकास आघाडीचा नाही. तर यामध्ये सर्व महारष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस प्रदेाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.


सीमा भागातील गावांचा राज्य सरकारवर अविश्वास -महाराष्ट्राच्या चारही बाजूने सीमाभागात असलेल्या गावांना विश्वास देणे राज्य सरकारचे काम आहे. मात्र हा विश्वास द्यायला सरकार कमी पडत आहे. त्यामुळे या गावांचा राज्यसरकार वर विश्वास नसल्याने सीमा भागातील गावे इतर राज्यात जाण्याची मागणी करू लागले आहेत असं यावेळी अजित पवार म्हणाले. तसेच कर्नाटक बँकेला महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र फडणवीस धादांत खोटे बोलत आहेत. महा विकास आघाडी सरकार असताना अधिकाऱ्यांचे पगार खासगी बँकेत असताना काही घडल्याने अडचणी निर्माण होतील म्हणून काही बँकांबाबत शासन निर्णय घेण्यात आला. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना प्राधान्य होते. मात्र यामध्ये कर्नाटक बँक नव्हती. या सरकारने केवळ एका दिवसात शासन निर्णय काढून कर्नाटक बँकेसंबंधी निर्णय घेतला. हा निर्णय केवळ एक दिवसात घेण्यात आला. या सर्व विषयावर हिवाळी अधिवेशनात आपण मुद्दा उपस्थित करणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

Last Updated : Dec 8, 2022, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details