महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gujarat Election: निवडणूक गुजरातची; सुट्टी महाराष्ट्राला केंद्र सरकारचा नवा पायंडा - ​जनतेच्या पैशाचा गैरवापर

Gujarat Election: आजवर ज्या राज्यात निवडणुका होतात, तेथेच सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. मात्र, गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील काही भागांत पगारी सुट्टी जाहीर केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरुन केंद्र सरकार निशाणा साधताना, नवा पायंडा पाडला जात असल्याची टीका केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार

By

Published : Nov 23, 2022, 4:52 PM IST

मुंबई: आजवर ज्या राज्यात निवडणुका होतात, तेथेच सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. मात्र, गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील काही भागांत पगारी सुट्टी जाहीर केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरुन केंद्र सरकार निशाणा साधताना, नवा पायंडा पाडला जात असल्याची टीका केली. विधानभवनात पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

शेजारच्या राज्यात निवडणुका, सुट्टी महाराष्ट्रात :गुजरात विधानसभा​ निवडणूक येत्या 1 ते 5 डिसेंबर रोजी होत आहे.​ निवडणुकी​त​ महाराष्ट्रात राहणा​​ऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे​, ​म्हणून​​ सरकारने पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर​ केला आहे. सरकारने काय करा​वे ​हा सरकारचा निर्णय आहे​.

15 वर्षे सत्तेत: ​परंतु शेजारच्या राज्यात निवडणूक आहे, त्यामुळे आपल्या राज्यातील काही ठरावीक जिल्ह्यात सुट्टी हे पहिल्यांदा ​पा​हिले आहे.​​ दर पाच वर्षांनी निवडणूका येतात, पण मला नाही आठवत की, राज्य सरकारमध्ये काम करत असताना सुट्ट्या दिल्या​ आहेत​. आम्ही 15 वर्षे सत्तेत हो​तो​​. त्यावेळी मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकात निवडणुका झाल्या. मात्र आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली ​नसल्याचे अजित पवार म्हणाले​.

​जनतेच्या पैशाचा गैरवापर:देशाच्या पार्लमेंटच्या निवडणूक असताना सर्वांना सुट्टी दे​णे, एकवेळ समजू शकतो. पण अशाप्रकारे आदेश पाहिल्यादा​चे घडले असून चुकीचे पायंडे पड​त आहेत. आजवर 365 दिवसांपैकी सर्व प्रकारच्या सुट्ट्या पकडून पगारी, आजारी अशा जवळपास पावणे दोनशेहून अधिक सुट्ट्या दिल्या जातात​. ​राज्याचा गा​डा​ हाकताना अधिकारी, कर्मचारी ​सहा ​महिने सुट्टीवर जात असेल तर काम क​से​ होणार​, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. सरकारने याचा​ गांभीर्याने विचार​ करायला हवा. अधिकारी​, कर्मचारी​ सहा महिने पगारी सुट्टी घेत ​असतील, तर जनतेचा टॅक्स रुपाने आले​ल्या​ पैशांचा​ हा​ गैरवापर​ होत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details