मुंबई:अनुज पटेल यांना रविवारी मेंदू विकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांच्यावर अहमदाबादच्या केळी रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना सोमवारी सकाळी हवाई रुग्णवाहिकेने उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.
पटेल यांच्यावर होणार शस्त्रक्रिया:भूपेन पटेल यांचे चिरंजीव अनुज पटेल यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अत्यंत गुंतागुंतीची असणारी ही शस्त्रक्रिया प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. बी. के. मिश्रा यांच्या देखरेखीखाली पार पडेल.
'ते' अद्याप निश्चित नाही:अनुज पटेल यांनापुढील उपचारासाठी जर्मनी येथे स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता; मात्र त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयातच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर पुढील उपचारासाठी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
कोण आहेत अनुज पटेल?अनुज पटेल हे 37 वर्षीय असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन पटेल यांचे एकुलते एक चिरंजीव आहेत. अनुज हे बांधकाम व्यावसायिक आहेत; यांच्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाल्यामुळे गुजरात राज्याच्या कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहणार नव्हते.
18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ: भारतीय जनता पक्षाचे नेते भूपेंद्र पटेल यांनी 12 डिसेंबर, 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते दुपारी 2 वाजता गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर आयोजित समारंभात पटेल राज्याचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधानांव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरू: मंत्रिपदाचे उमेदवार निवडण्यासाठी भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. जाती आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा समतोल साधण्याच्या कसोटीवर पक्षाला चालावे लागेल. ते म्हणाले की, आमदार कनू देसाई, राघवजी पटेल, हृषीकेश पटेल, हर्ष संघवी, शंकर चौधरी, पूर्णेश मोदी, मनीषा वकील आणि रमण पाटकर हे नेते मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:BJP Manifesto For Karnataka : 'सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करू', भाजपचे कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आश्वासन