महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुढीपाडव्यानिमित्त गिरगावमध्ये हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन - welcomed

हिंदू नववर्ष गुढीपाडव्या निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील सांस्कृतिक राजधानी गिरगावात भव्य प्रमाणात हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे नववर्ष शोभायात्रेचे खास आकर्षण म्हणजे पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक विषयावर आधारीत बनविलेले आकर्षक चित्ररथ होते.

गिरगावमध्ये एकवटले मुंबईच्या गुढीपाडव्याचे प्रतिबिंब

By

Published : Apr 6, 2019, 6:12 PM IST

Updated : Apr 6, 2019, 9:51 PM IST

मुंबई - गुढीपाडवा आणि मुंबईच्या दक्षिणेकडे असलेले मराठमोळे गिरगाव हे वेगळेच समीकरण आहे. गिरगावातील शोभायात्रा पाहण्यासाठी दूरवरून नागरिक येतात. पारंपरिक कपडे परिधान करून दिसणारी युवा पिढी, सामाजिक संदेश देणारे रथ येथील नववर्षाच्या शोभायात्रेत दिसून येतात. एक वेगळेच वातावरण गिरगावच्या शोभायात्रेत अनुभवता येते. यावेळी रंगशारदाने पोलिसांच्या कार्याला समर्पित केलेल्या रांगोळीचे सर्व स्तरातून कौतूक झाले.

गिरगावमध्ये एकवटले मुंबईच्या गुढीपाडव्याचे प्रतिबिंब

श्री स्वामी समर्थांची २४ फूट भव्य सुबक मूर्ती, चिमुकल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज पालखी देखावा, महिला लेझिम पथक, मुंबईतील नामांकित ढोल पथक जगदंब व रुद्राक्ष यांचे सादरीकरण, १०० महिला बाईक स्वार, १५ आकर्षक भव्य देखावे हे यंदाच्या गुढीपाडवा शोभायात्रेचे आकर्षण होते.

हिंदू नववर्ष गुढीपाडव्या निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील सांस्कृतिक राजधानी गिरगावात भव्य प्रमाणात हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे नववर्ष शोभायात्रेचे खास आकर्षण म्हणजे पौराणिक ऐतिहासिक व सामाजिक विषयावर आधारीत बनविलेले आकर्षक चित्ररथ. या चित्ररथांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित, महाराष्ट्रातील पारंपरिक उत्सवाची माहिती देणारे आणि शास्त्रज्ञांनी अंतराळात केलेली भरीव कामगिरी शोध यांची माहिती होती. याचबरोबर मुंबईतील प्रसिद्ध जगदंबा व मोरया या ढोलपथकांनी २५० कलाकारांच्या साथीने कला सादर केली. मनमोहक नृत्य, महिलांचे लेझीमपथक, कोकणातील विविध नृत्यांचे प्रकार, भजन, भारुड, लेझीम यांच्यासोबत ७५ महिला बाईकस्वारांचे पारंपारिक वेषात मोटर सायकलवरील परेड यामुळे शोभायात्रेत सहभागी झालेल्याचा आनंद द्विगुणित झाला.

सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांना रंगशारदाच्या रंगोळी कलाकारांनी रांगोळी काढून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये रंगशारदातर्फे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या जातात.

मुंबई पोलीस दल हे 24 तास, वर्षाचे बाराही महिने व्यस्त असते. हे पोलीस दल कर्तव्य बजावत असताना आपलं घर वगैरे सगळं विसरून पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी असतात. त्यांना रांगोळीच्या माध्यमातून मानवंदना द्यावी म्हणून गिरगाव येथील बिट क्रमांक 4 समोर आम्ही रांगोळी काढली. तसेच, गुढीपाडवा शोभयात्रेदरम्यान छोट्या छोट्या रांगोळी जागोजागी काढत असतो. असे रंगशारदाचे प्रसाद मुंडे यांनी सांगितले.

Last Updated : Apr 6, 2019, 9:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details