मुंबई- विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ( ST Workers ) ठाम आहेत. पालकमंत्री, आमदारांनी त्यांची मनधरणी करून कर्मचाऱ्यांची समजूत काढावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) , उपुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज (दि. 25) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संपकरी याला प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे.
संपाचा तिढा कायम
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात ठाण मांडले आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने भरघोस वेतनवाढ दिली. पण, विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. दुसरीकडे संप मागे न घेतल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, असा इशारा महमंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब ( Anil Parab ) यांनी दिला आहे. यामुळे कामगारांवर निलंबनाची कारवाई झाल्यास संप चिघळण्याची शक्यता आहे.