मुंबई -राज्यात कोरोनाचा संसर्ग विविध जिल्ह्यांमध्ये कमी होतांना दिसून य़ेत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमधील रुग्णसंख्याही कमी होत असल्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल. शिवाय ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊन उठू शकतो. परंतू सध्याच्या येणाऱ्या नवीन एसओपीप्रमाणे हॉटेल्स, इंडस्ट्री, सलून, व्यावसायिकांना दिलासा देण्यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
'या' बाबींवर कॅबिनेटमध्ये होईल निर्णय